दिवाळीनंतर एकादशीला तुलसी विवाह व त्यानंतर गोवर्धन पूजा देशभरात
केली जाते. गोप संस्कृतीची महत्त्वपूर्ण अनुष्ठाने यात जोडली गेली आहेत. एक
पर्व सण आणि सणापासून उत्सवाची एक पूर्ण संस्कृती दिवाळीसोबत तयार होत
गेली आहे.
देवत्रयीमध्ये श्रीविष्णू सृष्टीचे पालनकर्ता तसेच काळाच्या विभिन्न
रूपात नारायणाच्या शक्तीचे अवतार आहेत. अवतार शिव किंवा ब्रह्मदेवाचे नसून
विष्णूचेही अवतार आहेत. संगोपन करणाऱ्या कृपादायी त्राणापेक्षा मुक्ती
देणारे दशावतारी असतात. त्यांची आद्यशक्ती श्रीलक्ष्मीला धन-धान्य, वैभव,
समृद्धी आणि ऐश्वर्याची देवी म्हटले आहे. ते भूमी, अन्न, रत्न, अलंकार, धन
आणि सुखाचे बोध किंवा अनुभूतीचे अधिष्ठाता आहेत. दिवाळीला अनुष्ठानपूर्वक
त्यांचा पूजा-अर्चा विधी करण्यात येतो. भारतात दिवाळी ही
श्रीलक्ष्मीपूजनाचे पर्व नसून ती एक संस्कृती रचना आहे. "वैभव
लक्ष्मी'च्या आगमनाआधी घर, निवास आणि कार्यस्थळांची साफसफाई, योग्य व सुंदर
सजावट होते. वैभव प्रत्येक स्थानास आणि प्रत्येक
स्थितीत असू शकत नाही. तिच्या आगमनाने "स्वस्ती आणि स्वागताच्या' आधी स्वच्छ पवित्र वेश करावा लागतो.
स्थितीत असू शकत नाही. तिच्या आगमनाने "स्वस्ती आणि स्वागताच्या' आधी स्वच्छ पवित्र वेश करावा लागतो.
घरांमध्ये स्त्रियांना लक्ष्मीरूप मानले जाते. त्या सुंदर, सुरुचीपूर्ण वस्त्रालंकाराने सजून लक्ष्मीदेवतेचे स्वागत आणि पूजा करतात. स्त्रिया परिवारातील सजीव लक्ष्मी अाहेत. त्यांच्यामुळे परिवाराचे अस्तित्व असते. त्या कुळाची शोभा वाढवतात. त्याच घराची शोभाही आहेत.
दिवाळीच्या एक दिवस आधी श्रीधन्वंतरीची पूजा केली जाते. ते भारतातील आरोग्याचे, अायुर्वेदाचे अधिष्ठाता आणि आद्य संशोधक आहेत. "निरोगी काया'लाच सर्वात मोठे धन आणि वरदान म्हटले गेले आहे. धनत्रयोदशीला एखाद्या धातूच्या भांड्याची खरेदी करून शुभारंभ केला जातो. इतक्या आधारावर दिवाळीत लक्ष्मीचे पूजन केले जाते. दिवाळी सण किती व्यवहार्य आणि अनुष्ठानाची समग्रता आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. तो केवळ सण नसून एक संस्कृती आहे. याला भारतीय जीवनात सुंदरपणे रचले गेले आहे.
समुद्रमंथनासारखा विराट प्रकल्प करणे केवळ देवादिकांना शक्य नव्हते, दैत्यांचीही त्यासाठी मदत घ्यावी लागली. विषाक्त मदिराचल पर्वत मंथनासाठी आणि वासुकी नागाचा दोरखंड तयार करून समुद्रातून जे निघाले त्यात लक्ष्मीदेवता आहे. धनसंपदा केवळ इच्छा व्यक्त करून किंवा स्वप्ने पाहून येत नसते. जीवनात सागर मंथनसारखा विशाल उपक्रम आणि उद्योग करावा लागतो. तेव्हा लक्ष्मी प्रकट होते. "भूमी आणि समुद्र' संपदेचे अक्षय स्रोत आहेत. जीवनाच्या रचनेत त्याचा उपयोग करावा लागेल. तेव्हा कुठे ती मूल्यवान संपत्तीत बदलेल. कठाेर परिश्रम केल्याशिवाय, बेइमानी, भ्रष्ट मार्ग आणि अनीतीने केलेली धनसंपदा भ्रष्ट मार्गानेच कलंक सागरात बुडते.
लक्ष्मीच्या अनंत शक्तीमध्ये "श्री शक्ती' "माया'शक्ती सामावलेली आहे."माया' अद््भुत शब्द आहे. याच्या अर्थाचा विस्तार केला तर तो चकित करणारा आहे. जगात एखाद्या भाषेत असा शब्द असेल जो "अर्था'च्या इतक्या "विशाल समष्टी'साठी व्यवहारात करण्यात येतो. आर्ष परंपरापासून ते लौकिक ज्ञानापर्यंत याला एका निश्चित अर्थात बंदिस्त करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. हा एक शब्दच एक गूढ काव्यार्थ आहे. याच्या मर्माला चेतना ओळखते, परंतु भाषा सांगू शकत नाही. अशी शक्ती धारण करणाऱ्या लक्ष्मीचे पती श्रीनारायण विष्णूचे एक विशेषण "मायापती' असेही आहे. ते मायाशक्तीचे अधिपती आहेत. तेच मायापतीसुद्धा आहेत.
यासाठी दिवाळीला त्यांची पूजा करणे त्यांच्या "मायाशक्ती'साठीच करू नये. "समग्र लक्ष्मी'रूपाची प्रार्थना करा. व्यापार आणि श्रमाने अर्जित धन असावे. धनाच्या प्रदर्शनाचे अवडंबर आणि धनी असण्याचा गर्व नसावा. संपन्नतेचे ऐश्वर्य असावे. वैभवाची "अश्लीलता' नसावी. संपन्न होण्याची अनुभूती अहंकारात बदलून कोणा "वंचिता'चा अपमान करू नका. कामना करा की, श्रीलक्ष्मी समृद्धी दे पण ती टिकून राहण्यासाठी "शालीनता' जरूर दे. धनी करून आमचे मन छोटे आणि संकुचित होऊ देऊ नकोस. त्यामुळे करुणेचे स्रोत आटून जातील.
वस्तुस्थिती- समुद्रमंथनातून हलाहल विष, कामधेनू, अश्व,
एेरावत, कौस्तुभ मणी, रंभा, श्रीलक्ष्मी, वारुणी, चंद्रमा, पांचजन्य,
धन्वंतरी, अमृतकलश प्रकट झाले होते.